ॲड. डॉ. सुरेश माने यांचा वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप.
ॲड. डॉ. सुरेश माने यांचा वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप.
मुंबई - प्रतिनिधी.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) चे संस्थापक अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व संघर्षशील नेतृत्व, ऍड. डॉ. सुरेश माने सर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने माँ हॉस्पिटल, चेंबूर येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम मुंबई युनिट BRSP तर्फे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात मुंबई अध्यक्ष श्री. दिपक चौगुले यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी BRSP च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला यावेळी पंकज चाळके (युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष ), बाळासाहेब अडांगळे (जेष्ठ BRSP नेते), तुकाराम धांडोरे (जेष्ठ BRSP नेते), खालीलभाई शिरगांवकर (BRSP मुंबई उपाध्यक्ष), वत्सला हिरे मॅडम (दक्षिण मुंबई महिला आघाडी प्रमुख), धंनजय तुपलोंढे (जिल्हा महासचिव), सतेश मस्के (चेंबूर अध्यक्ष), अक्षय साळवे (प्रदेश पदाधिकारी कामगार आघाडील), अमर जाधव (वरळी विधानसभा प्रभारी), शशिकांत सोनवणे (चेंबूर पदाधिकारी), अमर भंडारे (जेष्ठ पदाधिकारी चेंबूर), प्रशांत आढाव (वॉर्ड अध्यक्ष १५०), प्रकाश कांबळे (युवा कर्यकर्ता), अभिजित कांबळे, राजू गायकवाड, सुरेश सूर्यवंशी, शाहरुखभाई आदी सहकारी उपस्थिती होते.




Comments
Post a Comment