कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
उंडाळे -प्रतिनिधी
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे संदेश घाडगे यांचे औषध उद्योगातील ट्रेंड आणि संधी या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या ते सिपला कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हेड, साऊथ आफ्रिका येथे कार्यरत आहेत.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मा कंपनीमधील नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली व ए.आईचा वापर करून आपण चांगल्या गुणवत्तेची औषधे कशी बनवू शकतो तसेच थ्रीडी प्रिंटिंगचा औषध कंपनीत कसा वापर करायचा, पॉलिफिल्सचा वापर करून आपण उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारावर कसा वापर करू शकतो हे सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी केले.
.jpg)
Comments
Post a Comment