वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये आपली संविधान पंच्याहत्तरी कार्यक्रम

 वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये आपली संविधान पंच्याहत्तरी कार्यक्रम 

शिराळा - प्रतिनिधी.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुलोम लोकराज्य अभियान यांच्या वतीने आपली संविधान पंच्याहत्तरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री बी. एम. नलवडे  यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते  हे होते.या कार्यक्रमास अनुलोम लोकराज्य अभियान सांगली जिल्हा व कोल्हापूर विभाग प्रमुख प्रशांत कुंभार , जनसेवक अनिल माने ,कार्यक्रमाचे वक्ते विधी तज्ज्ञ मा. ॲड.विशाल साळुंखे  आदि मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक मा.अरविंद सदावर्ते  यांनी बुके देऊन स्वागत  सत्कार केला.कार्यक्रमाचे वक्ते मा. ॲड. विशाल साळुंखे यांनी भारतीय संविधान निर्मिती व अमंलबजावणी इतिहास सांगितला.भारतीय राज्यघटना विविध समित्या व त्यांचे कार्य, भारतीय राज्यघटना कलमे, विभाग, परिशिष्ट, व त्यात आजपर्यंत झालेले बदल याविषयी विस्तारपूर्वक माहिती दिली.भारतीय संविधानातील विभागानुसार विविध कलमे, अधिकार, तरतुदी यांची माहिती दिली. भारतीय नागरिकत्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये, राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे, राज्यकारभार पद्धती इ. बाबींची माहितीपूर्ण विवेचन केले.अनुलोम लोकराज्य अभियान प्रमुख मा.प्रशांत कुंभार  यांनी भारतीय संविधान निर्मिती व्हिडिओ व पी पी टी. द्वारे दृकश्राव्य माध्यमातून संविधान मूल्ये रुजवली. जनसेवक अनिल माने यांनी प्रत्येक नागरिकाने संविधान अवलोकन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एच. इंगवले  यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन पाटील  यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .