एकता मंडळाच्या वतीने मलकापूर येथे वृक्षारोपण.
एकता मंडळाच्या वतीने मलकापूर येथे वृक्षारोपण.
एकता मंडळाचा स्तुत्य उपक्रम.
कराड - प्रतिनिधी.
कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील सलग पाच वर्षे गणराया अवाॅर्ड विजेत्या एकता मंडळाच्यावतीने ७९ व्या स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
एकता मंडळाची स्थापना १९८३ रोजीची असुन मंडळाने गेल्या ४३ वर्षांमध्ये आरोग्यशिबीर, रक्तदान शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी चिञकला,वतृत्वस्पर्धा, निबंध स्पर्धा,जेष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांसाठी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक क्षेञामध्ये नेहमी अग्रेसर असणार्या एकता मंडळाच्यावतीने आपल्या भारत देशाच्या ७९ व्या स्वातंञ्य दिनानिमित्त शास्ञीनगर येथे विविध औषधी वृक्षांसह इतर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष तानाजी देशमुख म्हणाले की वृक्षारोपण हि काळाची गरज आहे हवामानातील बदल येणार्या नैसर्गिक संकटांची चाहूल पर्यावरण आपणाला देत आहे. त्यामुळे समाजातील स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण ही चळवळ सुरु केली पाहिजे आपल्या परिसरामध्ये प्रत्येक सजग नागरिकाने एकतरी झाड लावले पाहिजे.वाढदिवस असो वा सण उत्सव आपण वृक्षारोपणाने साजरा करुया आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बहुसंख्येने झाडे लावूया असा सामाजिक संदेश दिला.
यावेळी राजेंद्र शिंगण,रामेश्वर आळसे महाराज, संदिप शिंगण, मंगेश सुरवसे,सुनिल मगदूम,अजय जाधव,बबन वास्के,विशाल सिद,फारुख बागवान,संभाजी शेडगे,राहूल केंगार बजरंग गोडगे,आर्यन ऐतवडेकर, विठ्ठल पवार,सचिन लावंड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूर :- वक्षारोपण करताना तानाजी देशमुख,राजेंद्र शिंगण,रामेश्वर महाराज,संदिप शिंगण,व इतर.


Comments
Post a Comment