अशोक चक्राचा अपमान – मध्य रेल्वेला BRSP कडून निषेध पत्र


अशोक चक्राचा अपमान बी.आर. एस.पी. कडून मध्य रेल्वेला  निषेध पत्र

मुंबई - प्रतिनिधी.

 बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी बी.आर.एस.पी. मुंबई प्रदेशाध्यक्ष दीपक एम. चौगुले यांनी आज मध्य रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन देऊन, स्वच्छता अभियानाच्या नावाखाली झालेल्या अशोक चक्राच्या अपमानाचा तीव्र निषेध नोंदविला.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीत भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रावर झाडू लावलेले दृश्य प्रसिद्ध झाले असल्याचे चौगुले यांनी निदर्शनास आणले. त्यांनी सांगितले की अशोक चक्र हे भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाचे गौरवचिन्ह असून, अशा प्रकारे केलेला अवमान हा असंविधानिक, दुर्दैवी व देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारा आहे.

निवेदनात बी.आर.एस.पी. ने खालील मागण्या केल्या आहेत.

संबंधित प्रकाराची तात्काळ चौकशी करणे.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे.

अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करणे.

वादग्रस्त जाहिराती तात्काळ रद्द करून सर्वत्रून हटविणे.

रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक माफी मागणे.

चौगुले यांनी सांगितले की ही मागणी केवळ कायदेशीर दृष्टिकोनातूनच नाही, तर भावनिक व राष्ट्रनिष्ठेच्या दृष्टीनेही अत्यावश्यक आहे.

बी.आर.एस.पी. ने स्पष्ट केले की, राष्ट्रचिन्हांचा अपमान कुठल्याही स्वरूपात सहन केला जाणार नाही आणि भविष्यात अशा घटना घडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .