शिव केदार विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.
शिव केदार विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विकास शिक्षण मंडळ कांदे चे शिव केदार विद्यालय, कांदे ता. शिराळा जि. सांगली येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.संस्थेचे जेष्ठ संचालक मा. विलास हुजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी संस्थेचे सर्व संचालक मा. निवासराव पाटील, मा. दीपक पाटील, मा.अरविंद पाटील, मा. विकास पाटील, महिला बाल सुरक्षा अधिकारी ,महाराष्ट्र शासन मा. संजय पाटील, मुख्याध्यापक मा. सौ. स्मिता पाटील,मा. सौ. सीतांजली जाधव,मा. रोहित पाटील, मा. सौ. तेजश्री पाटील,श्री. लहू कांबळे, श्री. आनंदा बंडगर, श्री. शैलेश चव्हाण, श्री. अमोल सपाटे. इयत्ता ९वी, १०वीच्या विद्यार्थ्यांनी झांजपथकाच्या साह्याने राष्ट्रध्वजास सलामी दिली. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येन उपस्थित होते.




Comments
Post a Comment