जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
शिराळा - प्रतिनिधी.
पाचगणी ता.शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाचगणी येथे १५ ऑगस्ट 2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावच्या प्रथम नागरिक मुंबई पोलिस सौ.सिध्दी सुजित चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कविता, भाषणे, नाटिका आणि गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत सर्वांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन शपथ घेतली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, एकता आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले.
शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.



Comments
Post a Comment