कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना.

 कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना.


गोंडवाना न्यूज नेटवर्क.

कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट खंडपीठाची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांना आता यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे सर्किट खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे खंडपीठ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना न्यायसेवा पुरवणार आहे. या निर्णयासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध झाले असून, हे खंडपीठ १८ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .