कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य व व्यावसायिक शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारे विकसित व्हावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्यांनी पाण्याचे शुद्धीकरण, रक्तदाबाचे मॉडेल, चेतापेशी, इंडस्ट्रीचा लेआउट, कार्बनचे शुद्धीकरण, उती वनस्पती अशा विविध विषयावर मॉडेल सादरीकरण केले.
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पूजा भोसले यांनी केले.

Comments
Post a Comment