दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबवा यासाठी निवेदन.
दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबवा यासाठी निवेदन.
शिराळा - प्रतिनिधी.
दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबावा यासाठी निवेदन देण्यात आले.भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका उपाध्यक्ष सुनिल घोलप यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आयु.रामदासजी आठवले यांना निवेदन पश्चिम महाराष्ट्र सचिव आयु.जगन्नाथ ठोकळे नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महापालिका यांच्या हस्ते देण्यात आले. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत असणाऱ्या कामांना पालकमंत्री खासदार, आमदार यांची शिफारस पत्रांची आवश्यकता कशासाठी तसेच संरक्षण भिंत व सामाजिक सभागृह ही मोठी कामे रद्द केली आहेत,त्या कामांचा समावेश करावा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले गटाची बैठक हुतात्मा नानकसिंग विद्यालय सोनवडे येथे संपन्न झाली. यावेळी हे निवेदन देण्यात आले.यावेळी आयु.ठोकळे म्हणाले आर. पी. आय. आठवले गट शिराळा तालुक्यात सक्षम पणे उभा करून तारूणांना उद्योजक बनवू राज्यातील व देशातील महायुतीचे सरकार आहे त्याचा फायदा करून घ्या.विद्यमान आमदार महायुतीचे आहेत ते सर्वतोपरी मदत करतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.स्वागत,प्रास्ताविक आयु.पांडुरंग नांगरे आर पी आय जेष्ठ नेते यांनी केले.आयु.अशोक कांबळे माजी नगरसेवक सांगली मिरज महानगर पालिका, भैरू बनसोडे तात्या, सुरेश घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आदिक पोळ, दिपक कांबळे, हारिष काळे उपस्थित होते. सुत्रसंचलन सुनिल घोलप यांनी केले आभार कृष्णा कांबळे यांनी मानले.

Comments
Post a Comment