CAA व NRC विरोधात मोर्चाला कराडमध्ये प्रचंड गर्दी. "भीम आर्मी व अनेक बहुजन संघटना झाल्या सामील ". कराड( प्रतिनिधी ) CAA व NRC या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी भीम आर्मीच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भीम आर्मी बरोबर या कायद्याला विरोध दर्शवणाऱ्या अनेक बहुजन संघटना सामील झाल्या. हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली.हा कायदा कशा पद्धतीनं मुस्लिम तसेच बहुजन समाजाला घातक आहे. या काळ्या कायद्याविरोधात त्वरित अंमलबजावणी करून हा बंद करण्यात यावा ही प्रमुख मागणी या मोर्चामध्ये होती. मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली तसेच कन्या शाळा ,दत्त चौक या मार्गे तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा येऊन निवेदन दिले. या मोर्चाच्या वेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय जावेद नायकवडी, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे , सातारा जिल्हा उपाध्यक्ष ,सातारा कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष अध्यक्ष भागवत कांबळ...