उंडाळे महाविद्यालयात नॅक विषयी मार्गदर्शन व्याख्यान संपन्न .
मार्गदर्शक प्रा. डॉ. गिरीश कल्याण शेट्टी .
उंडाळे - कला व वाणिज्य महाविद्यालय, उंडाळे याठिकाणी बुधवार दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी युजीसीच्या परामर्श योजनेअंतर्गत सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कराड यांच्यावतीने नॅक विषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे नॅक समितीचे समन्वयक प्रा.डॉ.गिरीश कल्याण शेट्टी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर कॉलेजचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा.गोडसे सर व श्री पाटील सर या व्याख्यानास उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.गिरीश कल्याण शेट्टी सरांनी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांना तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नॅक संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. अलीकडच्या काळात नॅकचे बदललेले स्वरूप, मूल्यांकन व मुल्यमापनाची पद्धती, त्या अनुषंगाने करावयाची कागदोपत्री पूर्तता याविषयी सविस्तर माहिती महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर वर्गाला दिली. तसेच पुढील काळात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नॅकचे असणारे योगदान व महत्त्व स्पष्ट केले.
या व्याख्यानाचे प्रास्ताविक उंडाळे महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य. शेख जे. एस.यांनी केले तर आभार साळुंखे एस. व्ही. व सूत्रसंचालन सागरे व्ही. एस. यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
![]() |
| नॅक विषयी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.गिरीश कल्याण शेट्टी. |


Comments
Post a Comment