भीम आर्मीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे सातारा जिल्हा दौ-यावर
कराड-
भीम आर्मी (भारत एकता मिशन )या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे हे उद्या रविवार दिनांक 12 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे येणार आहेत अशी माहिती भीम आर्मीचे सातारा जिल्हा प्रमुख संतोष थोरवडे यांनी पत्रकारांना दिली..ते दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह कराड येथे येतील व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संघटनेच्या कामाचा आढावा घेऊन संवाद साधणार आहेत. अॅड.चंद्रशेखर आझाद यांच्या सुटकेसाठी आणी नागरीकत्व सुधारणा कायदा, यावर संघटनेची आंदोलनाची रणनिती या विषयी मार्गदर्शन करून नुतन पदाधिका-या नियुक्त्या करणार आहेत. त्याच्या समवेत कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रविण कांबळे, राहूल गरड-पाटील, भागवत कांबळे, अशोक म्हस्के. अमर कांबळे, अनिल कांबळे. जितू सोनवणे, जयवंत सोनवणे, बाबुराव जाधव, मुन्ना भोजगळ, संतोष चव्हाण, विजय चव्हाण, सागर कुंभार, भरत थोरात, संतोष थोरात, प्रा.विनोद कांबळे, संतोष चोपडे. विशाल चोपडे, आदी कार्यकर्ते असणार आहेत.


Comments
Post a Comment