Posts

Showing posts from March, 2023

संपादक सुलतान फकीर यांना पितृशोक.

Image
  संपादक सुलतान फकीर यांना पितृशोक. अमानुल्ला फकीर यांचे  निधन. कराड - दैनिक लक्ष्मीपुत्रचे संपादक सुलतान फकीर यांचे वडील व कराड तालुका पेन्शन संघटनेचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी अमानुल्ला गणी फकीर (गुरुजी) यांचे 28 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कराड तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक विधवा महिलांना लवकरात लवकर पेन्शन मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच पेन्शन धारकांच्या विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी व वेळेवर पेन्शन बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून तालुका व जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन प्रश्न मार्गी लावण्यामध्ये अग्रेसर असत. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज 30 रोजी सायं 5.30 वाजता त्यांच्या घरी वैकुंठ धाम स्मशानभूमी (कब्रस्तान) कोळे (ता. कराड) येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वेबिनार संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे मा. संतोष टेंगले यांचे रोल अँड रिस्स्पासिबिलिटीज ऑफ फार्मासिस्ट इन कार्पोरेट हॉस्पिटल या विषयावरती वेबिनार संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट म्हणून कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या काय जबाबदाऱ्या असतात व व्यावसायिक दृष्ट्या कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे हे सर्व करताना लोकांचे आरोग्य कसे सुधारले पाहिजे व लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता कशी निर्माण करायची हे सर्व या व्याख्यानामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.  यावेळी संतोष टेंगले यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वैद्य यांनी केले तर आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी.  श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर त्यांची सामाजिक सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे  हेही संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गेले काही दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, पारंपारिक दिवस तसेच सध्याच्या मॉडर्न युगामध्ये रेट्रो डे असे विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते तसेच टाऊन हॉल कराड येथे विद्यार्थ्यांचे यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शशिकांत मोहिते यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम, श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील मॅडम, श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सुप्रिय...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन. कराड - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे एस.के.एस. बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सातारा सांगली कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. डिप्लोमा इन फार्मसी स्पोर्ट असोसिएशन व एस.के.एस. फार्मा स्पोर्ट व आय.पी.ए.- ए.पी.टी.आय. यांच्या सहयोगाने  ही स्पर्धा या महाविद्यालयामध्ये पार पडली. या स्पर्धेत मुलींच्यामधून अंजली मोरे एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी तासगाव या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक, सारिका पाटील संत गजानन महाराज फार्मसी महागाव या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक तर प्रथम क्रमांक शितल माळी एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी तासगाव  हिचा आला. तर मुलांमधून विशाल नेटके सावकार फार्मसी कॉलेज जयतापुर (सातारा) याचा तृतीय क्रमांक, प्रसाद शिंदे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव या विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक तर प्रथम क्रमांक मारुती नराटे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी आष्टा या विद्यार्थ्यांचा आला. या स्पर्...

जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता.

Image
  जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. १२३ दिवसांत ६,३३,२०७ मेट्रीक टन ऊसगाळप; ७,०४,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन कराड, ता. २२ : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला. धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण १२३ दिवसांच्या गळीत हंगामात ६ लाख ३३ हजार २०७ मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, ७ लाख ४ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी साखर उतारा १२.४९ टक्के इतका राहिलेला आहे. हंगाम सांगता सोहळ्याच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात सर्वाधिक ऊसवाहतूक करणार्‍या तोडणी वाहतूकदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कृष्णा काशीद, नवनाथ आरसुळ, भाऊसाहेब काशीद, बजरंग धोत्रे, अशोक पवार, किशोर मुळक, संतोष ढाकणे, सुंदर पोळ, हनुमान भिगले, बाबू शेंबडे या तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.  प्रारंभी कारखान्यातील मिल फ...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर.

Image
  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर. गोंडवाना न्यूज - ब्युरो रिपोर्ट. जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम रात्री उशिरा सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित व लक्ष लागून राहिलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. दि. 27 मार्च ते दि.3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. प्रत्यक्ष मतदान दि. 28 एप्रिलला होऊन त्यानंतर तीन दिवसांत निकाल जाहीर होतील. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे .  27 मार्च ते 3 एप्रिल अर्ज दाखल करणे. 5 एप्रिल अर्जाची छाननी होणार. 6 एप्रिल ते 20 अर्ज माघारीचा कालावधी. 21 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार. 28 एप्रिल मतदान होणार असून तीन दिवसांनी मतमोजणी व निकाल.

कराडमध्ये २ एप्रिलला कृष्णा मॅरेथॉनचे आयोजन.

Image
  कराडमध्ये २ एप्रिलला  कृष्णा मॅरेथॉनचे आयोजन. भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन. कराड - प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २ एप्रिल रोजी कराड येथे भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे.  कराड येथील शिवाजी विद्यालय येथे आयोजित ही मॅरेथॉन १४ वर्ष  वयोगटाखालील, तसेच १५ ते २०, २१ ते ३०, ३१ ते ४०, ४१ ते ५० आणि ५१ वर्षावरील वयोगट अशा विविध गटांत होणार आहे. ५ कि.मी. स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश फी, १० कि.मी. स्पर्धेसाठी ४०० रुपये प्रवेश फी व २१ कि.मी. स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार असून, सहभागी स्पर्धकांना टायमिंग बिब, टी शर्ट, मेडल, नाष्टा, ई-प्रमाणपत्र यासह आरोग्यविषयक सपोर्ट दिला जाणार आहे. १० कि.मी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ३००० रु., २००० रु. व १००० रुपयांचे रोख बक्षीस; तर २१ कि.मी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम, ...

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जेनेरिक मेडिसीनची जनजागृती करावी.

Image
  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जेनेरिक मेडिसीनची जनजागृती करावी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन.   सांगली दि. 6 (जि.मा.का.) : जेनेरिक मेडीसीनबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून यासाठी आरोग्य विभाग व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जनजागृती करावी. रुग्णांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.  आरोग्य विभाग व जन स्वास्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जन औषधी दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्वास हॉस्पिटल येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, श्वास हॉस्पिटलचे डॉ. अनिल मडके यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, गरिबांना स्वस्त किंमतीत औषधे उपलब्ध व्हावीत, औषधाअभावी कोणीही वंचित राहू नये यासाठी जन औषधी केंद्र सुरू करण्...

शिक्षणाचे नवे धोरण, नवी आव्हाने!

Image
  शिक्षणाचे नवे धोरण, नवी आव्हाने! प्रा. संभाजी पाटील. बदलत्या विश्वानुसार विविध क्षेत्रांत होणारे परिवर्तन लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्रातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भारताला शिक्षणपद्धतीची फार मोठी परंपरा लाभली आहे. त्यात आश्रम व्यवस्था, गुरुकुल पद्धती, योगी व ऋषींना असणारे महत्त्व, तक्षशिला व नालंदा विद्यापीठ आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आज समाजाच्या प्रत्येक घटकाला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे, तसेच शिक्षणक्षेत्रात जी सात्विकता टिकून आहे त्यामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक विभूतींचे मोलाचे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर 'ग्लोबल एज्युकेशन' ही नवी संकल्पना अस्तित्वात येत आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात व्यापक बदल होणे अपरिहार्य झाले आहे. बदल स्वीकारला तरच प्रगती - हा विचार रुजतोय. मात्र, हा भौतिक बदल होत असताना मूल्ये व संस्कृती संवर्धनाबरोबरच बदलत चाललेली मानसिकता संतुलित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.  भविष्यातील विद्यार्थी व शिक्षणपद्धती : प्रत्येक पालकाच्या अपेक्षा असते की, आपला पाल्य हुशार असावा, त्याचा वर्गात पहिला क्रमांक...

कराड तालुका सैनिक फेडरेशनची महा बैठक शासकीय विश्राम कराड येथे संपन्न.

Image
  कराड तालुका सैनिक फेडरेशनची महा बैठक शासकीय विश्राम कराड येथे संपन्न. कराड:प्रतिनिधी.    रविवार दि.5/3/2023रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यामध्ये माजी सैनिक महा जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली.त्याची प्रथम बैठक माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत(नि.)अध्यक्ष महाराष्ट्र सैनिक फेडरेशन यांच्या सूचनेनुसार मा. प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांच्या अध्यक्षतेखाली  कराड तालुक्यातील, कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची आजी/माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांची पहिली बैठक शासकीय विश्रामगृह कराड या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये सैनिकांच्या महसूल ,पोलीस ,नगर विकास, सहकार ,ग्रामविकास या सर्व अनेक विभागातील समस्या विषयी चर्चा व सैनिक संघटन बांधणी संदर्भात चर्चा करण्यात आली.शहीद कुटुंबीयांच्या व माजी सैनिक विधवा पत्नी त्यांच्या मुलांच्या संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न या संदर्भात महाराष्ट्र सरकार, शासकीय अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सैनिकांना वेगळा विचार करावा लागेल. जिल्ह्याच्या ठिकाणी भारत देश...

व्ही. एल. अँड सन्स कंपनीचे शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना.

Image
 व्ही. एल. अँड सन्स कंपनीचे शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना. उंडाळे: प्रतिनिधी   उंडाळे ता. कराड येथील व्ही. एल. अँड सन्स ऍग्रो फुड प्रोडूसर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील अवांतर ज्ञान मिळावे, याकरिता शेती अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून कंपनीमार्फत शेतकरी अभ्यास दौरा आखण्याची विभागातील पहिली संधी कंपनीने साधली आहे. व्ही. एल. अँड सन्स ऍग्रो फुड प्रोडूसर कंपनी गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. या माध्यमातून विभागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू ठेवत अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.  याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना शेती, आधुनिक तंत्रज्ञान व नव्या वाटा समजण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अग्री बिझनेस आणि परिवर्तन उपक्रमांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा आखण्यात आला आहे. यामध्ये कंपनीचे संचालक धनंजय पाटील, तेजस डांगे, मधुकर वाळके, सुजित शेवाळे, अक्षय शेवाळे व सुरेश डा...