व्ही. एल. अँड सन्स कंपनीचे शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना.
व्ही. एल. अँड सन्स कंपनीचे शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना.
उंडाळे: प्रतिनिधी
उंडाळे ता. कराड येथील व्ही. एल. अँड सन्स ऍग्रो फुड प्रोडूसर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील अवांतर ज्ञान मिळावे, याकरिता शेती अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून कंपनीमार्फत शेतकरी अभ्यास दौरा आखण्याची विभागातील पहिली संधी कंपनीने साधली आहे.
व्ही. एल. अँड सन्स ऍग्रो फुड प्रोडूसर कंपनी गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. या माध्यमातून विभागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू ठेवत अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना शेती, आधुनिक तंत्रज्ञान व नव्या वाटा समजण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अग्री बिझनेस आणि परिवर्तन उपक्रमांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा आखण्यात आला आहे. यामध्ये कंपनीचे संचालक धनंजय पाटील, तेजस डांगे, मधुकर वाळके, सुजित शेवाळे, अक्षय शेवाळे व सुरेश डांगे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व शेतकरी मनव गावचे रहिवासी आहेत. त्यांना आयोजित केलेल्या दौऱ्यात शेती व शेती पूरक व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यातून त्यांचा स्टार्ट अप विकास व्हावा, यादृष्टीने मांजरी (पुणे) येथील ऊस विकास संशोधन केंद्र, नाशिक येथील सह्याद्री ऍग्रो प्रोड्यूसर, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ व बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी भेटी होणार आहेत.
योजनेचे जिल्हा प्रमुख विजयकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे कंपनीचे चेअरमन विलासराव पाटील, व्यवस्थापकीय संचालक उदय पाटील यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment