कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वेबिनार संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वेबिनार संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे मा. संतोष टेंगले यांचे रोल अँड रिस्स्पासिबिलिटीज ऑफ फार्मासिस्ट इन कार्पोरेट हॉस्पिटल या विषयावरती वेबिनार संपन्न झाले.
विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट म्हणून कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या काय जबाबदाऱ्या असतात व व्यावसायिक दृष्ट्या कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे हे सर्व करताना लोकांचे आरोग्य कसे सुधारले पाहिजे व लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता कशी निर्माण करायची हे सर्व या व्याख्यानामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी संतोष टेंगले यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वैद्य यांनी केले तर आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले.
Comments
Post a Comment