कराड तालुका सैनिक फेडरेशनची महा बैठक शासकीय विश्राम कराड येथे संपन्न.
कराड तालुका सैनिक फेडरेशनची महा बैठक शासकीय विश्राम कराड येथे संपन्न.
रविवार दि.5/3/2023रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यामध्ये माजी सैनिक महा जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली.त्याची प्रथम बैठक माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत(नि.)अध्यक्ष महाराष्ट्र सैनिक फेडरेशन यांच्या सूचनेनुसार मा. प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांच्या अध्यक्षतेखाली
कराड तालुक्यातील, कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची आजी/माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांची पहिली बैठक शासकीय विश्रामगृह कराड या ठिकाणी पार पडली.
या बैठकीमध्ये सैनिकांच्या महसूल ,पोलीस ,नगर विकास, सहकार ,ग्रामविकास या सर्व अनेक विभागातील समस्या विषयी चर्चा व सैनिक संघटन बांधणी संदर्भात चर्चा करण्यात आली.शहीद कुटुंबीयांच्या व माजी सैनिक विधवा पत्नी त्यांच्या मुलांच्या संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न या संदर्भात महाराष्ट्र सरकार, शासकीय अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सैनिकांना वेगळा विचार करावा लागेल. जिल्ह्याच्या ठिकाणी भारत देशाची शान तिरंगा ध्वज हातात घेऊन आंदोलन करावे लागेल. असे निर्णय कराड तालुक्यातील सर्व माजी सैनिकांनी घेतले आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी सैनिक फेडरेशन 11 तालुक्या मध्ये माजी सैनिक संपर्क महा अभियान राबवत आहे तदनंतर अभियान पूर्ण झाल्यानंतर कलेक्टर महोदयांना अवगत करणार आहे.
या बैठकीमध्ये सूत्र संचालन कोपर्डे गट प्रमुख मा.माणिक पाटील यांनी केले. तालुका कार्याध्यक्ष श्री सदाशिव नागणे
यांनी स्वागत केले. मा प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामध्ये त्यांनी नमूद केले की थोर क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटले आहे की तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा यानुसार प्रशांत कदम यांनी माजी सैनिकाना म्हणाले तुम्ही मला तुमचा वेळ द्या तुम्ही फेडरेशनच्या पाठीमागे ताकद उभी करा सैनिकांनो तुम्ही एकत्र या संघटन मजबूत करा मी तुमचे सर्व प्रश्न सोडवले शिवाय राहणार नाही.जिल्हा उपाध्यक्ष मा.राजू केंजळे,कराड दक्षिण उपाध्यक्ष सचिन माने,कराड उत्तर उपाध्यक्ष दिलीप साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी कराड तालुका संघटक असलम शेख, उपाध्यक्ष सचिन माने,दिलीप साळुंखे, सातारा तालुका कार्याध्यक्ष रवींद्र शेळके, उपाध्यक्ष जाधव साहेब, पाटण तालुका अध्यक्ष विक्रम वरेकर कार्याध्यक्ष प्रकाश मसुगडे उपाध्यक्ष कुंभार साहेब, संघटक महापुरे साहेब, तालुका महिला अध्यक्ष सौ स्वाती बोराटे कार्याध्यक्ष सौ शेवाळे मॅडम,कराड शहर. अध्यक्ष श्रीमती सुप्रिया सोनटक्के,सर्व महिला वर्ग,सर्व पदाधिकारी,सर्व गावातील माजी सैनिक, शहीद कुटुंबीय ,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment