कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.


उंडाळे - प्रतिनिधी. 

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर त्यांची सामाजिक सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे  हेही संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गेले काही दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, पारंपारिक दिवस तसेच सध्याच्या मॉडर्न युगामध्ये रेट्रो डे असे विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते तसेच टाऊन हॉल कराड येथे विद्यार्थ्यांचे यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शशिकांत मोहिते यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम, श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील मॅडम, श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सुप्रिया पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले.

यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात किंवा क्रीडा क्षेत्रात चांगले यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.

या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी एकांकिका, गायन, नृत्य यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका आलेकरी व प्रा. सुनीता सुतार यांनी केले. तर आभार प्रा. पूजा भोसले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .