कराड येथील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश.

  कराड येथील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश.

कराड - प्रतिनिधी : –

कराड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल 96 कोटी 50 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. 

डॉ. अतुलबाबा भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासह कराड शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यानुसार कराड शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले सतत प्रयत्नशील होते. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याचबरोबर त्यांनी शासनाकडे स्टेडियमचा विकास आराखडाही सादर केला होता.

अखेर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश आले असून महायुती सरकारने कराडच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल 96 कोटी 50 लाख रुपयांचा भरघोस निधीची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवाजी स्टेडियमचा कायापालट होणार असून लवकरच कराड शहर आणि तालुक्यातील क्रीडाप्रेमींना अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे. स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून क्रीडाप्रेमींनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना धन्यवाद दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .