Posts

मा. लक्ष्मण मंडले यांना राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार प्रदान.

Image
मा. लक्ष्मण मंडले यांना राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार प्रदान. कराड - प्रतिनिधी. पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती संस्था मंडळे आदींचा गौरव करण्यात आला.यंदा संपूर्ण महाराष्ट्रातील 40 व्यक्तींना आणि संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यामध्ये मनव गावचे सुपुत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांचा ही या पुरस्कारा मध्ये समावेश होता.त्यांनी केलेल्या प्रशासकीय सेवे मध्ये अतुलनीय काम करून ग्रामीण भागातील कराड आणि पाटण तालुक्यातील वाड्यावसत्यावर योजना लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले व तसेच कोरोना काळात त्यांनी अविरत पणे काम करून या सर्व योजना पुर्ण केल्या.या त्यांच्या कामगिरीबद्दल खासदार श्रीनिवास पाटील या हस्ते राज्यस्तरीय प्राईड ऑप स्पंदन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शिवव्याख्याते प्रा.अरूण घोडके शिवचरित्र अभ्यासक प्रा.डॉ.प्रदीप यादव,स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे, प्रा.ए.बी.कणसे,अभिनेते रवी साळुंके,अभिनेत्री सुनंद...

कोडोलीतील हायस्कूलास आमदार फंडातून प्रिंटर भेट.

Image
  कोडोलीतील हायस्कूलास आमदार फंडातून  प्रिंटर भेट. कार्वे प्रतिनिधी:- प्रविण पाटील कोडोली येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली ता. कराड येथील हायस्कूलला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य थ्री इन वन प्रिंटरचे वाटप करण्यात आले.  हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पोतदार ए. जी. हे होते. तर कराड पाटण तालुक्यातील शाळा मधील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी हौसाबाई विठ्ठलराव प्रशाला कोडोली या शाळेस आमदार जयंत आजगावकर यांच्या शुभहस्ते थ्री इन वन प्रिंटर शिक्षक मोरे आय.जे.यांनी स्वीकारला. प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांनी तसेच  पालक, ग्रामस्थ यांनी शाळेस बहु उपयोगी थ्री इन वन प्रिंटर दिल्याबद्दल आमदार जयंत आसगावकर यांचे आभार मानले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा.

Image
  राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा. सातारा दि. 30 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन 2022-23 मधील मंजूर तरतुदीनुसार दायित्व वजा जाता किती रकमेची कामे घेण्यास वाव आहे याबाबतची माहिती तयार करणे तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रम आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामधील आमदार महोदय यांनी  सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांचा आढावा. राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसा...

एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील विद्यार्थ्यांचे यश .

Image
  एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये श्री कोटेश्वर विद्यालय गोवे  येथील विद्यार्थ्यांचे यश. कराड प्रतिनिधी:- सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम .एस परीक्षे श्री कोटेश्वर विद्यालय गोवे ता.जि. सातारा  या महाविद्यालया मधील  गुणवत्ता यादीत  साहील संतोष जाधव , सिद्धी शंकर जाधव , समिक्षा अशोक जाधव या तीन  विद्यार्थ्यांची  निवड झाली . या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी प्रतिवर्षी १२००० रु शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे . तर सहा विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवर्ती मिळणार आहे .या परीक्षेचे विभाग प्रमुख श्री लक्ष्मण उबाळे , प्राचार्या श्रीमती विभा साबळे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री नंदाभाऊ जाधव, सचिव तुकाराम आण्णा जाधव संचालक भुजंगराव जाधव शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील.

Image
    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील : ना. सोम प्रकाश. भाजपाच्या कराड दक्षिणेतील महिला संवाद मेळाव्याला महिलांचा उदंड प्रतिसाद. कराड, ता. ३० : देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड दक्षिणच्यावतीने आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित महिला संवाद मेळावा उदंड प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णादेवी पाटील, जिल्हाध्यक्...

भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथे बाईक रॅली.

Image
भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथे बाईक रॅली.   केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत . कराड, ता. ३० : सन २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टीने आत्तापासूनच सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विशेष दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीच्या निमित्ताने भाजपाने कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले.  ढेबेवाडी फाट्यापासून बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅलीच्या अग्रस्थानी असलेल्या वाहनात केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश, भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उभे होते.  भारत माता की जय अशा घोषणात देत निघालेली ही बाईक रॅली कोल्हापूर नाका, दत्त चौक, चावडी चौक मार्गे प्रीतिसंगम घाटावर पोहचली. त्याठिकाणी ना. सोम प्रकाश यांनी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र...

श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,मलकापूरचा विद्यार्थी रविराज सुतार याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

Image
  श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,मलकापूरचा विद्यार्थी रविराज सुतार याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. कराड - प्रतिनिधी.   श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित आ.च. विद्यालय व आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या खेळाडूचा गौरव म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच नुकत्याच नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियमवर संपन्न झालेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत रविराज सुतार याने हेक्झॅॅथलॉन या  क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा व त्याच्या पालकांचा सत्कार नुकता संपन्न झाला.           रविराज सुतार याचे  संस्थेचे सचिव शेतीमित्र  अशोकराव थोरात यांचे हस्ते व आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक दिलीप चिंचकर, सौ अरुणा कुंभार यांचे प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पुढील  गुवाहाटी येथे  होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.       सत्कार प्रसंगी बोलताना शेती मित्र अशोकराव थोरात म्हणाले की खेळामुळे शारीरिक हाल...