मा. लक्ष्मण मंडले यांना राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार प्रदान.
मा. लक्ष्मण मंडले यांना राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार प्रदान.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती संस्था मंडळे आदींचा गौरव करण्यात आला.यंदा संपूर्ण महाराष्ट्रातील 40 व्यक्तींना आणि संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यामध्ये मनव गावचे सुपुत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांचा ही या पुरस्कारा मध्ये समावेश होता.त्यांनी केलेल्या प्रशासकीय सेवे मध्ये अतुलनीय काम करून ग्रामीण भागातील कराड आणि पाटण तालुक्यातील वाड्यावसत्यावर योजना लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले व तसेच कोरोना काळात त्यांनी अविरत पणे काम करून या सर्व योजना पुर्ण केल्या.या त्यांच्या कामगिरीबद्दल खासदार श्रीनिवास पाटील या हस्ते राज्यस्तरीय प्राईड ऑप स्पंदन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शिवव्याख्याते प्रा.अरूण घोडके शिवचरित्र अभ्यासक प्रा.डॉ.प्रदीप यादव,स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे, प्रा.ए.बी.कणसे,अभिनेते रवी साळुंके,अभिनेत्री सुनंदा शेंडे,उपस्थित होते.
आभार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मानले.

Comments
Post a Comment