धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान,उंडाळे याच्यावतीने वृक्षारोपण.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान,उंडाळे याच्यावतीने वृक्षारोपण.
उंडाळे, प्रतिनिधी.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त ७५ व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून उंडाळे ता.कराड येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान,उंडाळे याच्यावतीने शेवाळवाडी(सवादे) वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत उंडाळे येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान, तरुणानी शेवाळवाडी(सवादे) येथील शिंदोबाची खडी येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये प्रतिष्ठानच्या तरुणामार्फत तयार करण्यात आलेल्या वड,पिंपळ आदी झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपणासाठी उंडाळे सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटिल, निवृत्त सैनिक राजेंद्र माळी, आस्लम खोत, विजय माळी,निवास पाटिल, महेंद्र पाटिल,तर प्रतिष्ठान चे संग्रामसिंह पाटिल, कपिल पाटिल, जय पाटिल, वरद पाटिल याच्यासह बहुसंख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment