स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर; खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार वितरण.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर;
खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार वितरण.
कराड - प्रतिनिधी .
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येते. सन 2019 व 2020 मधील पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केली आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून या संदर्भात प्रस्ताव मागवण्यात आले होते. सुमारे 600 प्रस्तावामधून 2019 मधील 30 व 2020 मधील 40 अशा व्यक्ती व संस्था यांची निवड करण्यात आली आहे.
सन 2019 आणि सन 2020 मधील पुरस्कार सोहळा कोरोना संसर्गामुळे झाला नव्हता. तो यंदा एकत्रित घेण्यात येत आहे. सदरील पुरस्काराचे हे 4 वर्ष आहे.
सिक्कीमचे माजी राज्यपाल व खा.श्रीनिवास पाटील, सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके, प्रेरणा सवंर्धन तज्ञ/परिवर्तन संस्था सातारचे किशोर काळोखे, शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक ह.भ.प. प्रा.डाॅ.प्रदीप पांडूरंग यादव, प्रा.ए.बी.कणसे (सर), महात्मा गांधी विद्यालय, पाचवडचे कलाशिक्षक बाळासाहेब कचरे (सर), कलाशिक्षक जयंत कदम (सर) व अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याशिवाय अभिनेते रविंद्र साळुखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अभिनेत्री राजश्री परुळेकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे.
सदर पुरस्काराचे वितरण व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान शनिवार दि.27 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता वेणूताई चव्हाण सभागृह, कराड, जि.सातारा येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रसिध्दीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Comments
Post a Comment