कृष्णा कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न.

 

कृष्णा कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न.


शिवनगर, ता.20: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन संपन्न झाले. चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते पूजन करून यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलर पूजा करण्यात आली. यावेळी संचालक जितेंद्र पाटील धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे,  सयाजी यादव, जे.डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील,वैभव जाखले, सेक्रेटरी मुकेश पवार, टेक्निकल को ऑर्डीनेटर एस. डी. कुलकर्णी, चीफ इंजिनीअर सुहास घोरपडे, प्रोसेस मॅनेजर डी.जी.देसाई, एम.के. कापूरकर, बाळासाहेब पाटील आदींसह सभासद शेतकरी, अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.


 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .