अक्षदा माने हिचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
अक्षदा माने हिचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
कार्वे प्रतिनिधी :-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती कराड यांच्या वतीने तालुकास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत इ.६ वी ते ८ वी मोठा गटात भारती विद्यापीठाचे हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली मधील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु.अक्षदा दत्तात्रय माने हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे आयोजन स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती सदन,कराड (टाऊन हॉल) येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम पंचायत समिती कराड (शिक्षण विभाग) यांच्या वतीने बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रणजीत पाटील डी.वाय.एस.पी.कराड.यांच्याशुभहस्ते व मा.तहसिलदार , गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड यांच्या प्रमुख उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. अक्षदा माने या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल तिचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.तरवारे के.पी.यांनी प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले.तिला मार्गदर्शन करणारे प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका सौ.संदे एस्.ए.,सौ.जाधव व्ही.ए., श्री.मोरे आय.जे.व श्री.आंबी एस्.ए.यांचे मार्गदर्शन लाभले. तिने हे यश संपादन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सर्व सदस्य ,पालक व कोडोलीतील ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment