साताऱ्यात जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड कार्यशाळा संपन्न.
साताऱ्यात जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड कार्यशाळा संपन्न.
कराड प्रतिनिधी:-( प्रविण पाटील)
साताऱ्यात जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड कार्यशाळाचे आयोजन यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज सातारा इथे करण्यात आले होते. यावेळी या कार्यशाळेस श्री महेश चोथे साहेब शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग यांच्या नियोजनानुसार श्री रमेश कोरे विज्ञान सल्लागार( कोल्हापूर विभाग), सौ. प्रभावती कोळेकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद, सातारा. श्री. रवींद्र खंदारे साहेब उपशिक्षणाधिकारी सातारा. प्राचार्य श्री जाधव बी टी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा. उपप्राचार्य श्री कांबळे सुधीर पर्यवेक्षक श्री निकम एन टी. सौ मंगल मोरे शिक्षण विस्तार अधिकारी तथा जिल्हा विज्ञान परिवेक्षिका यांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळा आज संपन्न झाली. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी नामांकने जिल्ह्याच्या वतीने सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व नवनवीन संकल्पना मांडून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व जास्तीत जास्त उपकरणांची राष्ट्रीय पातळीवरती निवड होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासंदर्भात विज्ञान प्रेमी शिक्षकांना या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मंगल मोरे यांनी करत असताना नामांकन प्रक्रियेमध्ये राज्यामध्ये जिल्ह्याचे स्थान, जिल्ह्यातून नामांकन प्राप्त झालेले विद्यार्थी, राज्यस्तरावर निवड झालेले विद्यार्थी, राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले विद्यार्थी यांची संख्यात्मक माहिती सादर करून जास्तीत जास्त नामांकन सादर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये श्री महेश चोथे यांच्या नियोजनानुसार शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी श्री रमेश कोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये कार्यशाळेचा उद्देश, गरज, महत्व आणि यामध्ये शिक्षकाची भूमिका याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच सौ.प्रभावती कोळेकर यांनी सहावी ते दहावी गटातील प्रत्येक विद्यालयातून पाच नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणे याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. श्री रवींद्र खंदारे यांनी मोजक्या व योग्य शब्दांमध्ये इन्स्पायर अवार्ड संकल्पना यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहन, देशाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता याविषयी सुरेख असे मार्गदर्शन केले. तदनंतर सायन्स कॉलेजचे श्री निकम यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा याचा होणारा परिणाम आणि यामध्ये विज्ञान शिक्षकाची भूमिका याविषयी गोष्ट स्वरूपामध्ये मार्गदर्शन केले. सौ मंगल यांच्या मेहनतीतून ही कार्यशाळा संपन्न होत असताना राज्यात इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेमध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यात शिक्षण विभाग व विज्ञान शिक्षकाची भूमिका विशद करून जिल्ह्यातून प्रदर्शनात सहभागी झालेली उपकरणे यातून राज्यस्तरावर निवड झालेली उपकरणे आणि योग्य संकल्पनेची निवड याविषयी सविस्तर माहिती दिली. आजच्या कार्यशाळेची तांत्रिक कार्यवाही करणारे जिल्हा समन्वयक श्री लक्ष्मण उबाळे यांनी नॉमिनेशन भरत असताना आवश्यक असणाऱ्या बाबी, येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि प्रत्यक्ष नॉमिनेशन भरणे याविषयी प्रत्यक्ष सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच श्री रमेश कोरे यांनी आपल्या समस्येतून नाविन्यपूर्ण संकल्पना कशा पद्धतीने निवडावी, परिसराचे बारकाईने निरीक्षण करून समस्या शोधणे, समस्यावरील उपाय शोधणे, त्यासाठी लागणारी साधने, प्रत्यक्ष कार्यवाही, साधनाचे उपयोग, साधनाची वैशिष्ट्य याबाबत विचार करून योग्य संकल्पनेची निवड कशी करावी याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच आपल्याच जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरती गौरव झालेल्या शाळांपैकी श्री रासकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय, नायगाव. श्री यादव परखंदी हायस्कूल, परखंदी. श्री टिंगरे सैनिक स्कूल, सातारा. यांनी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड, उपकरणाची निवड, राष्ट्रीय स्तरापर्यंत चा प्रवास व अनुभव तसेच विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणा याविषयी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हणमंत जाधव व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रशांत भोसले यांनी केले.


Comments
Post a Comment