कचरा डेपो प्रश्नी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा.

 कचरा डेपो प्रश्नी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा.

उंडाळे ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर.


प्रदिप पाटिल, उंडाळे.

  उंडाळे ता. कराड ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरुध्द उंडाळे येथील शेतकरी अकुंश रामचंद्र मुळीक व रामचंद्र मारुती मुळीक यांनी उंडाळे येथील ग्रामसेवक शरद जर्नादन चव्हाण व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कर्तव्यात कसुर केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न केल्यास स्वातंत्रदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी , उंडाळे ता.कराड येथील ग्रामपंचायत कडुन आठवड्यातुन दोन दिवसामध्ये गावातील कचरा गोळा केला जातो.  संबंधित कचराची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावता संबंधित कचरा उंडाळे गावापासुन पश्चिमेस असण्या-या बंधाऱ्याच्या भिंतीलगत कच-या डेपो  गेला ५ ते६ वर्षापासुन याठिकाणी जमा केला जात असून कचरा डेपोस आग लावल्यामुळे परिसरा धुराचे लोट पसरत असल्यामुळे आसपासच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  संबंधित कचरा डेपोच्या  बंधाऱ्यालगत असल्यामूळे बंधारातुन होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात धुळ , धुळीचे कण मिसल्यामुळे दक्षिण मांड नदिलगच्या गावाच्या मानवी वस्ती व परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत, असून दुषित पाण्यामुळे दक्षिमांड नदिलगतच्या गावाना रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कचरा डेपोची उंडाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाना याबाबत वेळोवेळी तक्रार करुन याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करुन आपल्या कर्तव्यात कसुर केल्यामुळे उंडाळे सह दक्षिणमांड नदिलगतच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

  उंडाळे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक शरद जनार्दन चव्हाण यांच्या मनमानी कारभारमुळे उंडाळे गावासह नदिलगतच्या नागरिकाच्या आरोग्यशी खेळ करण्या-या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करुन मागणी मान्य झाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.सदरिल निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, उपविभागीय अधिकारी उपविभाग कराड व तहसीलदार कराड यांना पोस्टाने पाठवलेल्या असल्याची माहिती संबंधितानी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .