‘स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं काम केलं - श्रीनिवास पाटील.

 ‘स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं काम केलं - श्रीनिवास पाटील

तळमावले/वार्ताहर

‘स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. ट्रस्टने आतापर्यंत राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत असे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले ते पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या ‘‘राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड’’ सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके, प्रेरणा सवंर्धन तज्ञ तथा परिवर्तन संस्था सातारचे किशोर काळोखे, शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक ह.भ.प. प्रा.डाॅ.प्रदीप पांडूरंग यादव, प्रा.ए.बी.कणसे, महात्मा गांधी विद्यालय, पाचवडचे कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, कलाशिक्षक जयंत कदम, अभिनेते रवि साळुखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

खा.श्रीनिवास पाटील यांनी आपल्या रांगड्या मराठमोळ्या भाषेत उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला. ‘‘प्राईड’’ ‘‘स्पंदन’’, ‘‘संदीप’’ ‘‘डाकवे’’ या शब्दांचा अर्थ अगदी मोजक्या शब्दात सांगितला. ते पुढे म्हणाले, ‘‘या पुरस्काराने तुमची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. डॉ.संदीप डाकवे, स्पंदन परिवार यांनी आयोजित केलेला सोहळा पाहून मला खूप आनंद वाटला. डॉ.संदीप यांची आई वडील पाहिल्यानंतर मला माझे आई वडील आठवले.’’ बोलताना ते खूप भावूक झाले. त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींना, संस्थाना शुभेच्छा तर दिल्या. त्याचबरोबर आपल्या हातून उतरोत्तर चांगले कार्य घडत रहावो अशा भरभरुन सदिच्छा दिल्या.

शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके म्हणाले, ‘‘प्रत्येक घराघरांमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन होते. ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला जातो. त्याप्रमाणे शिवचरित्र ग्रंथाचेही वाचन केले पाहिजे. स्पंदन ट्रस्टने आयोजित केलेला सोहळा अतिशय सुंदर आहे. स्पंदन ट्रस्टने जपलेली सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद आहे.

संभाजीराजे यांचे विचार घराघरात पोहचले पाहिजेत. संभाजीराजे कोण होते हे समजून घ्यायचे असेल तर संभाजी महाराज यांचे चरित्र वाचले पाहिजे तरच संभाजी महाराज सिंहासारखा वाघ होता हे समजेल. अशा शब्दात शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक ह.भ.प.प्रा.डाॅ.प्रदीप पांडूरंग यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करत डाॅ.संदीप डाकवे आणि स्पंदन परिवारांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

परिवर्तनचे किशोर काळोखे म्हणाले, ‘‘स्पंदन म्हणजे काय तर हृदयाची एक टीक-टीक, त्यांनी काव्यात्मक शैलीत कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगितले. हा पुरस्कार म्हणजे मनाला चेतना देणारा पुरस्कार सोहळा आहे. स्पंदनचे उपक्रम नेहमीच मनाला प्रेरणा देतात.

दरम्यान, यंदाचा ‘‘स्पंदन जीवन गौरव पुरस्कार’’ खा.श्रीनिवास पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, सौ.गयाबाई डाकवे, राजाराम डाकवे, चि.स्पंदन डाकवे व स्पंदन परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच स्पंदन ट्रस्टच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारे ‘प्रतिबिंब’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात कलाशिक्षक सुरेश जाधव, सुनील राजे आणि विद्यार्थी यांनी गायलेल्या गीतांनी झाली. या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार 90, सॅल्युट कार्ड स्पर्धेतील 9, सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील 12 आणि 10 दिवाळी अंक स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पुस्तक, सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.

बाळासाहेब कचरे, जयंत कदम, अभिनेते रवि साळुखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, उत्तम बावडेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले तर आषारप्रदर्शन पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मानले. बहारदार सुत्रसंचालन प्रा.सुरेश यादव व प्रा.डाॅ.कोमल कुंदप यांनी केले. कार्यक्रमास सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्ती आपले कुटूंबिय, नातेवाईक व सहपरिवारासह उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कांबळे, संतोष करपे, विकास साळुंखे, ईलाही मुल्ला, ज्ञानेश्वर शेवाळे, सुरेश जाधव, जीवन काटेकर, अंजली गोडसे, रेश्मा डाकवे, भारती पोळ, पूनम जाधव व अन्य सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .