अभिजीत चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.
अभिजीत चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.
सातारा - प्रतिनिधी.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात. यामध्ये समाज भूषण, पत्रकार भूषण उद्योग, रत्न कृषिरत्न, आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार ८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन तलाव पाली ठाणे येथे होणार आहे यात या पुरस्कारांचे वितरण होईल. या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे . यामध्ये सातारचे सुपुत्र अभिजीत अवधूत चव्हाण यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Comments
Post a Comment