कृष्णा अभिमत विद्यापीठात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन उत्साहात.

 

कृष्णा अभिमत विद्यापीठात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन उत्साहात.




कराड, ता. १७ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात आज राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात संस्थेचे अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर्स, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत राज्यभरात आज सकाळी ठीक ११ वाजता सर्व ठिकाणी राष्ट्रगीताचे सामूहिक गायनाचे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले होते. यानुसार कृष्णा अभिमत विद्यापीठात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.


याप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, अतिरिक्त संशोधक संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल अॅीडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. आर. सी. डोईजड, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. पठाडे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .