समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूरचा वर्धापन दिन संपन्न.
समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर येथे डॉ.रंगनाथन जयंती तसेच वाचनालयाचा 30 वा वर्धापन दिन संपन्न.
मलकापूर - प्रतिनिधी.
समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर येथे डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती तसेच वाचनालयाचा 30 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले, मराठी भाषेतील वाचन संस्कृती वाढविण्याची आज गरज आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती अधिक अधिक रुजली पाहिजे. यासाठी समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालय सतत प्रयत्नशील असते. डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी वाचन संस्कृतीसाठी ग्रंथालयांची स्थापना केेली व त्यासाठी पंचसूत्री मांडली म्हणूनच त्यांना ग्रंथालय शास्त्राचे जनक असे संबोधले जाते.
याप्रसंगी बोलताना वाचक लक्ष्मण पवार म्हणाले की वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व घडते. त्यातून देशी हित साधले जाते. यासाठी प्रत्येकाने वाचले पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ स्वाती घाटगे यांनी केले.तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार कु.भाग्यश्री भोसले यांनी मानले.
कार्यक्रमास श्री सुधाकर शिंदे, श्री संपत पाटील, श्री गौरीहर देशमुख ,रामचंद्र जगताप, ग्रंथपाल बापूराव चव्हाण,सौ.अरुणा कुंभार सौ.एस.व्ही.भिसे,सौ.जे.डी.शिंदे, जयश्री पाटील,सौ.एस.डी.खंडागळे, सौ.रुपाली मुळे,श्री.एम.पी.फराळे,सर्व संचालक उपस्थित होते.

Comments
Post a Comment