स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकाच्या त्यागची माहिती तरुणाना समजणे गरजेचे...माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकाच्या त्यागची माहिती तरुणांना समजणे गरजेचे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
उंडाळे - प्रतिनिधी.
कराड दक्षिणमध्ये उंडाळे ता.कराड येथे आखिल भारतीय काँग्रेस कमिटिच्या वतीने काढण्यात आलेल्या आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आलेल्या पदयात्रेत ते म्हणाले, महात्मा गांधीनी ब्रिटीशांना चले जाव ची हाक दिल्याने क्रांतीदिनाला विशेष महत्त्व आहे. तरुणाना इंग्रजाच्या गुलागीरीतुन देश स्वातंत्र्य करण्यासाठी क्रांतिकारनी काही वेदना सहन कराव्या लागल्या त्या आजच्या पिढिने समजुन घेणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त कराड दक्षिण काँग्रेस कमिटिच्या माध्यमातून या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले. या पदयात्रेची सुरुवात उंडाळे बाजार पेठ येथुन स्वा दादासाहेब उंडाळकर स्मारकापर्यंत करण्यात आले होते. यावेळी येळगाव जिल्हा परिषद गटातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज घेवुन कार्यकर्तानी घोषणा देवुन स्वा.दादासाहेब उंडाळकर पुतळ्याला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस उदयसिंह पाटिल, सातारा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष डाँ.सुरेश जाधव , सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग चव्हाण ,कराड काँग्रेस दक्षिणचे मनोहर शिंदे अध्यक्ष मनोहर शिंदे, याच्यासह येळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment