व्ही.एल. अँड सन्स उत्पादक कंपनीचे चे कार्य कौतुकास्पद: मा.बसवराज बिराजदार.

 व्ही.एल. अँड सन्स उत्पादक कंपनीचे चे कार्य कौतुकास्पद: मा.बसवराज बिराजदार.



उंडाळे - प्रतिनिधी.

 उंडाळे, तालुका कराड येथील व्ही .एल.अँड सन्स ऍग्रो फूड प्रोडूसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीस कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक मा.बसवराज बिराजदार, यांनी सदिच्छा भेट देऊन कंपनीच्या कार्याचे कौतुक केले.

याप्रसंगी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.बिराजदार यांनी शेती क्षेत्रात व्यावसायिकता कशी निर्माण करावी व शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करून   शेतीमालाचे मूल्यवर्धन कसे करावे याबद्दल अधिक माहिती दिली.

त्याचबरोबर व्ही .एल . अँड सन्स, कंपनीने भविष्यात बीजोत्पादन व प्रक्रिया उद्योगात भरीव कार्य करून सभासद शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे या सदिच्छा दिल्या.

याप्रसंगी विभागीय कृषी अधिकारी मा. श्री दौलतराव चव्हाण , तालुका कृषी अधिकारी कराड  रियाज मुल्ला साहेब, मंडल कृषी अधिकारी उंडाळे नांगरे मॅडम ,कृषी सहाय्यक तोरणे साहेब उपस्थित होते.

कंपनीचे संचालक श्री. उदय पाटील सौ. विद्या पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व संचालक श्री.धनंजय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .