जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभीषिका स्मृति दिवस चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभीषिका स्मृति दिवस चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन.

स्वातंत्र सैनिक बाळकृष्ण गोविंद शेवाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे झाले उदघाटन.

सातारा , दि. 14 (जिमाका): भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी मोठया प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले. त्यात अनेकांना आपले जीवनही गमवावे लागले. अनेकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्याच्या झळा पुढे अनेक वर्ष बसत राहिल्या. त्याच्या स्मृती आणि त्यांच्या प्रती असलेली सहवेदना आपल्या स्मरणात राहव्यात म्हणून देशभर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या "विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे " उदघाटन  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण गोविंद शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.


     यावेळी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे ,तहसीलदार सुषमा पैकेकरी,तहसीलदार अमर रसाळ,   आणि इतर मान्यवर उपस्थित होते . हे प्रदर्शन दिवसभर सर्वांसाठी खुले असणार आहे.


 यावेळी जिल्हाधिकारी  म्हणाले

या प्रदर्शनात त्याकाळातले दुर्मिळ फोटो, त्यात गर्दीने भरलेल्या रेल्वे, त्या काळातील या हिंसाचाराचे दैनिकात आलेल्या बातम्या हे सगळे आहे. आपल्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती मोठी किंमत मोजली आहे हे प्रदर्शन पाहुन आपल्याला कळेल आणि आजच्या स्वातंत्र्याचे मोलही कळेल .


तसेच यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण गोविंद शेवाळे हे कार्यक्रमास आल्याबदल आभार व्यक्त केले. 


हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केले आहे.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .