‘कृष्णा’वर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन.

 ‘कृष्णा’वर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन.

शिवनगर, ता. ५ : सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, धोंडीराम जाधव, जे.डी.मोरे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, सेक्रेटरी मुकेश पवार आदींसह मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले,  आप्पासाहेबांच्या सहकारातील योगदानामुळे कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णाकाठ समृद्ध झाला आहे. आप्पासाहेब यांनी सहकाराबरोबरच शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील विधायक कामातून लाखो लोकांचे जीवनमान उंचावले. आप्पासाहेब यांनी विविध संस्थांच्या उभारणीतून एकाचवेळी या भागात सहकार, उद्योग, आर्थिक, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रात क्रांती घडवून आणली. ज्यामुळेच आज कृष्णाकाठी विकासाचे नंदनवन दिसून येत आहे. 


अभिवादन प्रसंगी एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, हेमंत धर्मे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .