माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अभिषेक गावंडे.

 

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अभिषेक गावंडे.




ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अभिषेक गावंडे तर दर्यापूर तालुक्का अध्यक्ष पदी अमोल राऊत यांनी नियुक्ती.

माहिती अधिकार महासंघ भगतसिंह ही पदवी मिळालेले अभिषेक कळाशी गावाचे ग्रामपंचायत सदस्य भ्रष्टाचार मुक्त भारत घडवण्याचा उद्देश असणारे सर्वसामान्य लोकांना माहिती अधिकारातून न्याय मिळवून देणारे याच्या कामाची चर्चा पूर्ण जिल्हा भर गाजलेली असताना महासंघ त्यांच्या कामाची व्याप्ती बघता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष बसवेकर व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. शेखर कोलते सर यांच्या आदेशा नुसार त्यांना अमरावती जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले तसेच आमला येथील युवा ग्रामपंचायत सदस्य गोर गरीब सामान्य जनतेचे निस्वार्थी मनाने काम करून भ्रष्टाचार मुक्त भारत देशाचे स्वप्न बघणारे अमोल नंदकिशोर राऊत यांची दर्यापूर तालुक्का अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या तरुण सभासद कडून माहिती अधिकार प्रचार व प्रसार मोठा होईल तसेच त्यांच्याकडून भविष्यात भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था कशी तयार होईल अशी अपेक्षा संघाचे पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आली तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .