कोडोलीतील हायस्कूलास आमदार फंडातून प्रिंटर भेट.

 कोडोलीतील हायस्कूलास आमदार फंडातून  प्रिंटर भेट.

कार्वे प्रतिनिधी:- प्रविण पाटील

कोडोली येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली ता. कराड येथील हायस्कूलला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य थ्री इन वन प्रिंटरचे वाटप करण्यात आले. 

हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पोतदार ए. जी. हे होते. तर कराड पाटण तालुक्यातील शाळा मधील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी हौसाबाई विठ्ठलराव प्रशाला कोडोली या शाळेस आमदार जयंत आजगावकर यांच्या शुभहस्ते थ्री इन वन प्रिंटर शिक्षक मोरे आय.जे.यांनी स्वीकारला. प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांनी तसेच  पालक, ग्रामस्थ यांनी शाळेस बहु उपयोगी थ्री इन वन प्रिंटर दिल्याबद्दल आमदार जयंत आसगावकर यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .