येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील जिल्हा हिवताप अधिकारी बाबासाहेब सानप यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर .
येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील जिल्हा हिवताप अधिकारी बाबासाहेब सानप यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर .
कराड - प्रतिनिधी.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध प्रकारचे यामध्ये समाज भूषण, पत्रकार भूषण उद्योग रत्न कृषिरत्न आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार ८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन तलाव पाली ठाणे. येथे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.यामध्ये येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील जिल्हा हिवताप अधिकारी बाबासाहेब सानप यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल वैद्यकीय अधिकारी नरेंद्र माळी. ग्रामपंचायत येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी.आदीनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment