एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील विद्यार्थ्यांचे यश .

 एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये श्री कोटेश्वर विद्यालय गोवे  येथील विद्यार्थ्यांचे यश.


कराड प्रतिनिधी:-

सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम .एस परीक्षे श्री कोटेश्वर विद्यालय गोवे ता.जि. सातारा  या महाविद्यालया मधील  गुणवत्ता यादीत  साहील संतोष जाधव , सिद्धी शंकर जाधव , समिक्षा अशोक जाधव या तीन  विद्यार्थ्यांची  निवड झाली . या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी प्रतिवर्षी १२००० रु शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे . तर सहा विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवर्ती मिळणार आहे .या परीक्षेचे विभाग प्रमुख श्री लक्ष्मण उबाळे , प्राचार्या श्रीमती विभा साबळे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री नंदाभाऊ जाधव, सचिव तुकाराम आण्णा जाधव संचालक भुजंगराव जाधव शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .