Posts

१६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा.

Image
  १६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा. गोंडवाना न्यूज नेटवर्क:-  सोळावा वित्त आयोग येत्या ८ व ९ मे, २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १६ व्या वित्त आयोगाच्या दौ-याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर, सदस्य एस. चंद्रशेखर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वित्त विभागाच्या सचिव ए.शैला, यांच्या सह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते...

कोल्हापूरच्या युवकांनी कोल्हापुरातच करावा रोजगार.

Image
  कोल्हापूरच्या युवकांनी कोल्हापुरातच करावा रोजगार.     जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन. कोल्हापुरातील एमआयडीसीत मिळणार मुंबई पुण्याप्रमाणे सोयीसुविधा कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): मुंबई, पुण्यातील एमआयडीसी मध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा कोल्हापुरातील कागल, गोकुळ शिरगाव, शिरोली, हातकणंगले एमआयडीसीत मिळण्यासाठी कामगार विभाग, एमआयडीसी, कौशल्य विकास विभाग आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी याठिकाणच्या रिक्त जागा व त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आदी सर्वसमावेशक माहितीवर आधारित आराखडा तयार करुन भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे, अशा सूचना देवून   असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा विशेष कामगार संघटनांच्या मोहिम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने "जिल्ह्यातील कामगार संघटनांशी चर्चा सत्र व उद्योगाच्या अडचणींच्या निराकरणाबाबत कामगार संघटनांचे प्रतिनिधी व उद्योजकांसोबत  जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोल्हा...

ऐरोली खाडी येथे उभा राहणार कांदळवन सफारी पार्क.

Image
  ऐरोली खाडी येथे उभा राहणार कांदळवन सफारी पार्क. गोंडवाना न्यूज वृत्तसेवा:- ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई भागातील ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवन असून येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे वास्तव्य असते. पर्यटनाच्या दृष्टिने या भागात कांदळवन सफारी पार्क (मँग्रोव्ह पार्क) उभारण्याच्या दृष्टिने अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. मंत्रालयात वन विभागाच्या विविध विषयासंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीला महाराष्ट्र इस्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी उपस्थित होते.

मुंबईत बनावट नकाशे सादर करुन बांधकाम केलेप्रकरणी गुन्हे दाखल.

Image
मुंबईत बनावट नकाशे सादर करुन  बांधकाम केलेप्रकरणी गुन्हे दाखल. गोंडवाना न्यूज वृत्तसेवा :-  मुंबईत बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळविलेली होती. अशी बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एस.आय.टीद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महानगरपालिकेमार्फत जुलै महिन्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.  याबाबत विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यांबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार सर्वश्री योगेश सागर, सुनील शिंदे प्रत्यक्ष तर ॲड. अनिल परब, सचिन अहिर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी ई -उपस्थित होते. आयुक्त गगराणी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अशी ४५७ बांधकामे असून त्यापैकी ६६ प्रकरणी कारवाई करण्यात आली असून इतरांना नोटीस देण्यात येईल. एसआयटीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशीनुसार २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरकुल योजनेचा निधी जलद मिळणार.

Image
  घरकुल योजनेचा निधी  मिळणार जलद  .  गोंडवाना न्यूज वृत्तसेवा. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या घरकुलाचा निधी मिळवताना लाभार्थ्यांना खूप विलंब लागत होता. पण, आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी लाभार्थ्यांना हा निधी टप्पानिहाय ऑनलाईन पध्दतीने मिळण्यासाठी सुविधा तयार केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना विनाविलंब घरकुलाचा निधी मिळणार आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने बेघरांसाठी घरकुलाची योजना राबविली जाते. यासाठी निधीही दिला जातो. तर जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण), प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महा अभियान, रमाई आवास योजना (ग्रामीण), मोदी आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (वैयक्तीक), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास आदी घरकुल योजना राबविल्या जातात. यासाठी घरकुल मिळालेल्या लाभाऱ्श्यांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येते. यासाठी लाभाऱ्श्याांना प्रक्रिया पार पाडावी लागते.घरकुलाचे टप्पानिहाय बांधकाम झाल्यावर लाभार्थी...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न.

Image
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न.   अध्यक्षपदी राहुल भोसले यांची निवड. कराड - प्रतिनिधी.    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक सर्वसाधारण बैठक माजी नगरसेवक आयु.शांताराम थोरवडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार पेठ कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडली. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष आयु. राहुल भोसले यांनी पुष्पहार अर्पण केला.तर सांस्कृतिक भवन येथे बुध्द वंदना घेऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  यावेळी मागील वर्षाचा अहवाल वाचन कमेटीचे सचिव संतोष बोलके यांनी केले यास सर्व संमतीने मान्यता देण्यात आली. व मागील वर्षाची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी अध्यक्ष पदासाठी काही नांवे पुढे आल्याने काही काळ बैठकीत गोंधळ निर्माण झाला. काही वेळाने पुन्हा बैठक शांततेत पार पडली व मागील कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे सन 2025 ते 2026 च्या जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष म...

डॉ. अतुलबाबा भोसले : जनसेवेचे एक आदर्श नेतृत्व.

Image
 डॉ. अतुलबाबा भोसले : जनसेवेचे एक आदर्श नेतृत्व. ब्युरो रिपोर्ट गोंडवाना न्यूज - (प्रि.वि. धुळप)  . कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे लोकसेवेसाठी समर्पित, निस्वार्थी आणि कृतिशील नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहेत. ‘बोले तैसा चाले’ या विचारसरणीवर ठाम असलेले डॉ. भोसले आपल्या कार्यामुळे लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करतात. कोणतीही वेळ असो, आव्हान कितीही मोठे असो, त्यांनी नेहमीच लोकसेवेसाठी तत्पर राहण्याचे व्रत स्वीकारले आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या डॉ. अतुलबाबांनी एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य करता आले असते. मात्र, त्यांनी सामाजिक कार्य आणि जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. कोणतीही समस्या तडीस नेईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत, आणि म्हणूनच त्यांचे नेतृत्व नैतिकतेच्या भक्कम आधारावर उभे आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची ओळख पारदर्शक, नैतिक आणि लोकाभिमुख नेते म्हणून झाली आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांशी संपर्क ठेवत, त्यांच्या गरजा समजून घेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते दिवसरात्र कार्यरत असतात. डॉ. अतुलबाबांचे कुटुंब सहकार चळवळीशी नाते जोडले...