डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न.

 अध्यक्षपदी राहुल भोसले यांची निवड.


कराड - प्रतिनिधी.

   भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक सर्वसाधारण बैठक माजी नगरसेवक आयु.शांताराम थोरवडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार पेठ कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडली.

प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष आयु. राहुल भोसले यांनी पुष्पहार अर्पण केला.तर सांस्कृतिक भवन येथे बुध्द वंदना घेऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

यावेळी मागील वर्षाचा अहवाल वाचन कमेटीचे सचिव संतोष बोलके यांनी केले यास सर्व संमतीने मान्यता देण्यात आली. व मागील वर्षाची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी अध्यक्ष पदासाठी काही नांवे पुढे आल्याने काही काळ बैठकीत गोंधळ निर्माण झाला. काही वेळाने पुन्हा बैठक शांततेत पार पडली व मागील कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे सन 2025 ते 2026 च्या जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष म्हणून आयु. राहुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात यावा असे ठरविण्यात आले. या बैठकीला निशांत ढेकळे मेहरबान  आयु. राजकुमार लादे , प्रविण लादे, किरण थोरवडे, आप्पासाहेब गायकवाड, किशोर आठवले, दिलीप काटरे, संतोष थोरवडे, आनंदराव लादे, सुरेश लादे , सुर्यकांत थोरवडे, यश थोरवडे व इतरांनी सहभाग घेतला. बैठकीचे सुत्रसंचलन दत्तात्रय दुपटे यांनी केले तर शेवटी आनंदराव लादे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .