धनंजय मुंडे यांचा राजीनामा.

        धनंजय मुंडेंचा राजीनामा. 

ब्युरो रिपोर्ट -शकुर मुल्ला.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवारी) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे.हे मंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन पहिली प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बीड बंदची हाक.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज बीड शहरातील दुकाने, कार्यालये बंद आहेत. बीडमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड शहरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .