जालना येथील संशयित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा.
जालना घटनेतील संशयित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा.
____मा.अनिकेत भाऊ साळुंखे.
कराड - प्रतिनिधी.
मा.अनिकेत भाऊ साळुंखे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फकिरा पँथर सेना ) यांच्या उपस्थितीत समाजभूषण संदीप तात्या ठोंबरे ( संस्थापक अध्यक्ष फकिरा पँथर सेना ) यांच्या अदेशाने कराड येथील तहसीलदार कार्यालयात तसेच कराड शहर पोलीस ठाण्यात, जालना येथील झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आलं.कैलास बोराडे हे मंदिरात जाण्यासाठी आलेले होते. परंतु तेथील गुंढ प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना अडवले व त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण केली. चुलीवर तापवलेल्या रॉड च्या सहाय्याने केलास यांच्या गुप्त अंगावर चटके देण्यात आले त्यांना जीवे मरणाचा प्रयत्न झाला.
अश्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना महाराष्ट्र राज्य सरकारने आळा घालण्यासाठी मकोका अंतर्गत कारवाई करून जनतेला सुरक्षित ठेवावे, ही मागणी अनिकेत भाऊ साळुंखे यांनी निवेदनाद्वारे केली केली. यावेळी मा.अनिकेत भाऊ साळुंखे , जितेंद्र सूर्यवंशी, विक्रम कदम, अक्षय येडगे व संतोष कुकडे उपस्थित होते.
कराड: तहसीलदार कराड यांना निवेदन देताना अनिकेत साळुंखे जितेंद्र सूर्यवंशी, विक्रम कदम, अक्षय येडगे व संतोष कुकडे इ.




Comments
Post a Comment