वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अंजनी पाटील यांनी केले.प्रारंभी विद्यालयात धर्मवीर , स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त छ. संभाजी महाराज विनम्र अभिवादन करण्यात आले.विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी व्यसनमुक्ती शपथ घेतली. विद्यालयातील भरत नलवडे सर यांनी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी व्यसन, व्यसनाचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम याविषयी व्याख्यान दिले. आज राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार शालेय व महाविद्यालयीन स्तरावर वाढती व्यसनाधीनता मोठी समस्या समोर येत आहे. ते रोखणे ही काळाची गरज आहे. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे पीढी संकटात सापडली असून त्यातून पीढीला मुक्त करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन तसेच मार्गदर्शन मा.मुख्याध्यापक सदावर्ते यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजनी पाटील यांनी केले.तर आभार प्रदर्शन उज्वला पाटील यांनी केले.

Comments
Post a Comment