हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांचे जैवविविधता संवर्धनासाठी अनोखा उपक्रम.


हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांचे जैवविविधता संवर्धनासाठी अनोखा उपक्रम. 

 उंडाळे -प्रतिनिधी.

उन्हाच्या प्रचंड तडाख्याने पक्षांना होणारा त्रास लक्षात घेऊन  २० मार्च या जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील हरीत सेनेचे विद्यार्थी व एस आर दळवी फाउंडेशन व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने हरीत  सेनेच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी शाळेच्या परिसरात ठिकठिकाणी पाणी, खाद्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.या उपक्रमाचे  परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. 

सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढली आहे. निसर्गात पाण्याची कमतरता जाणवू लागलेली आहे. त्यामुळे माणसाबरोबर पशुपक्ष्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी पक्षी मृत होत आहेत. पाण्यासाठी पशु - पक्षी धडपडताना दिसत आहेत. सध्या शिवारात पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे पक्षांना खाद्य मिळत नाही. पक्षांची हि अवस्था पाहून

प्राचार्य बी आर पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी पशूपक्षासाठी  निसर्गात पाणी व  खाद्य  उपलब्ध केले आहे. 

शाळेच्या परिसरातील झाडावर प्लास्टिकची भांडी पाणी भरून ठेवले आहेत, झाडाच्या सावलीत खाद्य ठेवले आहे. या बरोबरच विद्यार्थीनी स्वतः च्या घरांच्या  छतावर पाणी ठेवण्याबरोबरच ज्वारीचे कणसे लटकून ठेवले आहेत,जेणेकरून पक्षांना तिथे सहज पोहोचता येईल तसेच एस. आर दळवी फाउंडेशनचे पर्यावरण विभाग प्रमुख धनंजय पवार यांनी परिसरातील विविध गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मूटभर  धान्य आणण्याचे आवाहन केले आहे.  शालेय परिसरात पक्षांना पाणी व अन्न मिळू लागल्याने  पक्षांनी मोठ्या प्रमाणात धान्य खाणे व पाणी पिण्यास सुरुवात केली आहे असे चित्र पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. 

याबाबत प्राचार्य बी. आर. पाटील म्हणाले की, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्षांना खाद्य मिळणे पाणी मिळणे अवघड झालेले आहे. त्या पक्षांची तडपड होत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडे, खिडक्या अशा ठिकाणी पाणी खाद्य  ठेवल्याने पक्षांची सोय झाली असून परिसरात पक्षांचे वास्तव्य वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे शक्य होणार आहे.  विद्यार्थ्यांना पक्षाबद्दल प्रेमभावना जागृत होण्यास मदत होणार आहे. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एस आर दळवी फाउंडेशनचे पर्यावरण विभाग प्रमुख धनंजय पवार, शंकर आंबवडे, प्रदीप ओबासे, रवींद्र भोये  आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हरीत सेनेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


उंडाळे : परिसरातील पशुपक्षी यांच्या साठी पाणी, व खाद्य ठेवता राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी.                       (छायाचित्र जगन्नाथ माळी उंडाळे)

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .