सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्पोट.
सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट.
कराड - प्रतिनिधी.
यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरची चाचणी घेत असताना बॉयलरचा स्फोट झाला. गुरूवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.जखमीमध्ये शैलेश भारती (वय ३२, रा. उ.प्रदेश), अमित कुमार (वय १९, रा. बिहार), धर्मपाल (वय १९, रा. उ. प्रदेश ) अशी जखमीची नावे आहेत. यशवंतनगर येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे गाळप सुरू आहे. पंधरा दिवसापूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसविण्यात आला आहे. त्याची आठ दिवसापासून चाचणी सुरू आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास चाचणी सुरू असताना तेथे मोठा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत चाचणीचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. कारखानास्थळावर पोलिसयंत्रनेसह आपत्कालीन यंत्रणा दाखल झाली आहे.

Comments
Post a Comment