पवित्र रमजान महिना आणि रोजाचे महत्व.
पवित्र रमजान महिना आणि रोजाचे महत्व.
रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे स्नेहभाव वाढविणारा हा महिना, हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.रमजान मंगल्याचे प्रतीक आहे पवित्र कुराणचे अवतरण याच महिन्यात झाल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला महत्व दिले जाते. त्यामुळे रमजानची रात्र हजार रात्री पेक्षा मोठी रात्र मानली जाते. या रात्रीस पूर्ण वेळ मस्जिद मध्ये नमाज पठण करने अल्लाहच्या (खुदा) समीप जाने होय. रमजानच्या रात्री पठण केलेल्या नमाजचा मोबदला सत्तरपटीने जास्त असतो.
रमजान महिन्याचे तीन हिस्से.
रमजान इस्लामी कॅलेंडर नुसार नववा महिना असतो. रमजान महिन्याचा पहिला हिस्सा कृपेचा दुसरा क्षमेचा आणि तिसरा हिस्सा केलेल्या चुकापासून मुक्ततेचा मानला जातो.या महिन्या अल्लाह क्षमादान देईल व केलेल्या चुका माफ करेल. त्यामुळे वर्षभरातील आकरा महिन्यात मिळणारी नेकी (पुण्याई) सत्तर पटीने जास्त असते.त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीजास्त नेकी (पुण्य)मिळविण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात पाणी अन्न आणि वेळेचा त्याग करून अल्लाहची प्रार्थना करतात.
रमजान मध्ये रोजा याचा अर्थ स्वतःवर नियंत्रण मिळवणे, रमजानच्या पवित्र महिन्यात संपूर्ण दिवस रोजा (उपवास ) करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत.त्यास शारीरिक व मानसिक संयमाची फार गरज असते मन एकाग्र करण्यासाठी देखील फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे इबादत (प्रार्थना ) करण्याकारिता मानसिकता निर्माण होतो. त्यामुळे मुस्लिम बांधवामध्ये संपूर्ण रमजान महिना हा भक्तिमय, प्रार्थनामय, व उपवासमय होत असतो.
रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत अल्लाहची (खुदा ) इबादत केली जाते. मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरीत्या परिभाषित करण्यात आले आहे. यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मुलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात. इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात.
रमजानच्या पवित्र महिन्यात इबादत(प्रार्थना) याचा असर काही वेगळाच असतो.अत्याचार, अनीती, वाईट विचार या गोष्टी सोडून,मानव जातीतील चांगुलपणा,मांगल्यावर अंतःकरण पूर्वक प्रेम करने.मनात नितिमूल्याची जपणूक करने, परोपकाराची भावना रुजवणे, चांगले विचार ऐकण्याची सवय लावणे. ही रमजान महिन्याची विशेष शिकवणूक, ईद म्हणजे आनंद उत्सव हा एकमेकांच्या शुभेच्छांनी साजरा करायचा असतो.
_________ शकुर मुल्ला.
.jpeg)
Comments
Post a Comment