दलित महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण बडेकर यांची निवड.
दलित महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण बडेकर यांची निवड.
कासेगाव - प्रतिनिधी.
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण उर्फ बापूराव बडेकर यांची डॉ. उत्तम दादा मोहिते प्रेरित दलित महासंघ (मोहिते गट) युवक सांगली जिल्हाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली.बापूराव बडेकर हे सामाजिक राजकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक व समाजासाठी असणारी तळमळ व आक्रमकपणा व अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते. सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तम दादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यांची ही निवड करण्यात आली. यावेळी सुधीर कांबळे, भास्कर चव्हाण,चैतन्य मदने, अमित अवताडे उमेश कांबळे, सागर, सचिन तोडकर, बंडा देसाई, अमोल माने, उल्हास भंडारी, अतुल माने, योगेश माने, चैतन्य माने, किरण माने, इ. मान्यंवरानी शुभेच्छा दिल्या.


Comments
Post a Comment