ऐरोली खाडी येथे उभा राहणार कांदळवन सफारी पार्क.
ऐरोली खाडी येथे उभा राहणार कांदळवन सफारी पार्क.
गोंडवाना न्यूज वृत्तसेवा:-
ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई भागातील ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवन असून येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे वास्तव्य असते. पर्यटनाच्या दृष्टिने या भागात कांदळवन सफारी पार्क (मँग्रोव्ह पार्क) उभारण्याच्या दृष्टिने अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. मंत्रालयात वन विभागाच्या विविध विषयासंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीला महाराष्ट्र इस्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी उपस्थित होते.
.jpeg)
Comments
Post a Comment