कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील दिक्षा साबळे व सायली गिरीगोसावी या विद्यार्थिनींनी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव येथे घेण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थिनींचा स्पर्धेचा विषय रोल ऑफ फार्मासिस्ट इन मॅनेजिंग लाइफस्टाइल डिसिज हायपरटेन्शन असा होता. या विद्यार्थिनींचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व शिक्षक यांनी केला. प्रा. अरुणा परीट यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .